
EVENTS @ BMM AROUND THE U.S.A

गणपतीबाप्पा मोरया!
लंबोदर, गजवदन, विघ्नहर्ता असा हा गणपती बाप्पा, जो येताना प्रसन्नता घेऊनच येतो आणि ज्याच्या आगमनासाठी सगळेजण नेहमीच उत्सुक असतात, त्या गणाधीशाच्या स्वागताला महाराष्ट्र मंडळ शिकागोची कार्यकारिणीही सिद्ध झाली आहे सर्व सभासदांच्या साक्षीने हा उत्सव साजरा करण्यातली मजा काही औरच !
येत्या २३ ॲागस्टला, आपण सगळे मिळून ह्या एकदन्ताचं स्वागत करू या. मंडळाच्या सभासदांची गाणी, नृत्ये , त्याचबरोबर युवकांचं अथर्वशीर्ष पठण, गीता पठण, ‘फिलाडेल्फियाची विनोदवारी’ हे कार्यक्रम, तसंच, हेरिटेज वर्ल्ड मराठी कॉम्पिटिशनमध्ये पुरस्कार प्राप्त झालेली फिलाडेल्फियाची एकांकिका, ‘ कालाय तस्मै नमः’!
असा हा भरगच्च कार्यक्रम म्हणजे ‘ चुकवू नये असे काही! '
कार्यकारिणीने जोरदार तयारी सुरू केली आहे. तुम्ही पण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने, ढोलताशाच्या गजरात गणराजाच्या स्वागताला तयार व्हा.
Event details
दिनांकः २३ ॲागस्ट २०२५
स्थळः Barrington High School,
616W Main St, Barrington
IL- 60010
Please use this link to reserve your seats.
https://www.tugoz.com/events/maharashtra-mandal-chicago/Ganeshotsav2025
ह्या उत्सवात आपण अनुभवणार आहोत सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल आणि घरच्या गणेशोत्सवाची आठवण करून देणारे सुग्रास जेवण!
मेनू : उकडीचे मोदक, उंदियो, हरभऱ्याची उसळ, कोशिंबीर, खमण, डाळ तडका, भात, पोळ्या, केशर श्रीखंड, फ्रूट छुन्दा, पापड, मुखवास!
📅 दिनांक: शनिवार, २३ ऑगस्ट २०२५
📍 ठिकाण: Barrington High School, 616 W Main St, Barrington, IL 60010
🕥 कार्यक्रमाची रूपरेषा
10:30 AM : नोंदणी
10-11 AM : गणेश पूजन, आरती, प्रसाद, अथर्वशीर्ष पठण
11-12:30 PM : गीतापठण, फिलाडेल्फियाची विनोदवारी व स्थानिक कार्यक्रम
1-2:30 PM : तृप्त करणारे उत्सवी भोजन
2:30-4 PM : हॅरिटेज विश्व मराठी एकांकिका स्पर्धेत गाजलेली, पाच पारितोषिक विजेती धम्माल विनोदी एकांकिका "कालाय तस्मै नमः"
4:15-5 PM : ढोल ताशाच्या गजरात गणेश विसर्जन
W: www.mahamandalchicago.org
Email: karyakarini@mahamandalchicago.org